Rohit Pawar On Ram Shinde | अजित पवारांची तक्रार करणं हा रडीचा डाव, रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला

Rohit Pawar On Ram Shinde | अजित पवारांची तक्रार करणं हा रडीचा डाव, रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांनी राम शिंदेंच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांची तक्रार करणं हा रडीचा डाव असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
Published by :
shweta walge
Published on

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार रोहित पवार पुन्हा विजयी झाले. त्यानंतर भाजप उमेदवार आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मी नियोजित कटाचा बळी ठरलो, असा आरोप करत राम शिंदेंनी थेट अजितदादांवर संशय व्यक्त केला यावरुनच रोहित पवार यांनी टीका करत प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित पवार म्हणाले की, यंत्रणेचा वापर करून, सगळं करून देखील त्यांना पराजय पत्करावा लागला म्हणून ते नैराश्यात आहेत. अजित दादांची तक्रार करणं हा रडीचा डाव आहे अशी टीकाही रोहित पवारांनी केली आहे.

काय म्हणाले होते राम शिंदे?

“आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेढा येथे एक वक्तव्य केलं आहे. त्या वक्तव्यावरून एक गोष्ट लक्षात आली आहे की महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लागण्यापूर्वीच त्यांच्यात कौटुंबिक अघोषित करार झाला होता. किंबहुना कर्जत-जामखेडसंदर्भात करार झाला होता. माझ्याविरोधात कट रचला गेला होता आणि मी त्या कटाचा बळी ठरलो आहे. मला आज त्याचा प्रत्यय आला”.

मी वारंवार महायुतीचा धर्म पाळण्यासंदर्भात वरिष्ठांकडे व अजित पवारांकडे मागणी करत होतो. परंतु, आज अजित पवार यांनी रोहित पवारांना स्वतःच सांगितलं की मी सभेला आलो असतो तर तुझं काय झालं असतं? याचा अर्थ हा नियोजित कट होता आणि त्या कटात माझा बळी गेला आहे. या सगळ्या राजकीय सारीपाटात मी बळी ठरलो आहे”. दरम्यान, यावेळी राम शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही यासंदर्भात वरिष्ठांकडे तक्रार करणार आहात का? त्यावर शिंदे म्हणाले, “मला माझ्या वरिष्ठांना, महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांना सुचवायचं आहे की हे सगळं महायुतीसाठी चांगलं नाही. माझ्यासाठी तर नाहीच नाही. यावर वरिष्ठांनी गांभीर्याने दखल घ्यावी, अशी माझी अपेक्षा आहे.”

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com