दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक; रोहित पवार म्हणाले...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक; रोहित पवार म्हणाले...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. ईडीकडून दोन तासांच्या चौकशीनंतर ईडीने केजरीवाल यांना अटक केली. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे. रोहित पवार म्हणाले की, दिल्लीचे मुख्यमंत्री मा. अरविंद केजरीवाल यांची अटक ही अहंकाराचा कहर आहे…. आज ही परिस्थिती असेल तर चुकून २०२४ ला भाजप सत्तेत आली तर संविधान आणि लोकशाही हे सर्वांना विसरावं लागेल.

या काळात मा. अरविंद केजरीवाल यांच्यासोबत महाराष्ट्राचीही स्वाभिमानी मराठी जनता आहे. या कारवाईवरुन मात्र एक स्पष्ट झालं की, भाजप घाबरलीय!. असे रोहित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com