‘स्वाईन फ्ल्यू'चा धोका वाढतोय; ठाण्यात 3 दिवसांत 5 जणांचा मृत्यू
कोरोना पाठोपाठ स्वाईन फ्ल्यूने देखिल डोकं वर काढले आहे. स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. जिल्ह्यात अवघ्या 3 दिवसांत 5 जणांचा स्वाईन फ्ल्यूमुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे. या मृतांमध्ये ठाण्यातील तीन तर कल्याण-डोंबिवली या ठिकाणच्या दोघांचा समावेश आहे. एकीकडे तब्बल 170 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत.
स्वाईन फल्यूची टेस्टिंग नवी मुंबईत सुरु करण्यात आली असून स्वाईन फल्यूची टेस्टिंग करणारी नवी मुंबई ही राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे. 4 ऑगस्ट 2020रोजी सुरु करण्यात आलेल्या या कोविड टेस्टिंग लॅबमध्ये आतापर्यंत 13 लाख 73 हजार 288 इतक्या चाचण्यात करण्यात आल्या आहेत.
ठाणे जिल्ह्यात मागील तीन दिवसांमध्ये स्वाईनच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. 52 रुग्णांची वाढ झाल्याची माहिती आहे. त्यामुळे रुग्णांचा आकडा 402 झाला आहे. तर या आजारानं मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत पाचनं वाढ झाली आहे. कल्याण-डोंबिवली सहा रुग्णांची वाढ झाल्यानं रुग्णांची संख्या 56वर गेली असून दोन जणांचा मृत्यूची नोंद झाल्यानं मृतांचा आकडा पाच इतका झाला आहे.