Rishi Sunak : ऋषी सुनक येणार पाच भाषेत; वाचकांचा उदंड प्रतिसाद

Rishi Sunak : ऋषी सुनक येणार पाच भाषेत; वाचकांचा उदंड प्रतिसाद

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यावर पत्रकार दिगंबर दराडे यांनी लिहिलेलं पुस्तक बेस्ट सेलर ठरत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

पुणे : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यावर पत्रकार दिगंबर दराडे यांनी लिहिलेलं पुस्तक बेस्ट सेलर ठरत आहे. अवघ्या एका महिन्यांमध्ये तब्बल पाच आवृत्या निघाल्या आहेत. हे पुस्तक हिंदी, इंग्लिश, कन्नड, गुजराथी सह जर्मन भाषेतही काढण्यात येणार आहे. लंडन येथे जाऊन दराडे यांनी आपल्या पुस्तकामध्ये सुनक यांच्या व्यक्तीमत्वाच् विविध पैलू उलगडले आहेत. युवक युवतींकडून मोठा प्रतिसाद असलेयाचे दिगंबर दराडे यांनी सांगितले. ते म्हणाले, युवक आणि युवतीकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. लंडनमध्ये राहत असलेल्या आणि तिकडे शिक्षण पूर्ण करून आलेल्या तरूणांच्याकडून या पुस्तकाचे विशेष कौतुक होत आहे.

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती व सुधा मूर्ती यांचे ते जावई आहेत. ज्या देशाने आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केले त्या देशाचा पंतप्रधान एक भारतीय वंशाचा आणि हिंदू आहे. या अभूतपूर्व घटनेने भारतीय म्हणून आपली छाती नक्कीच फुलून येत आहे. एक स्थितप्रज्ञ, हिंदू संस्कृतीचा अभिमान बाळगणारे, मंदिरात जाऊन पूजा करणारे गोपूजा करणारे, गीतेवर हात ठेवून खासदारकीची शपथ घेणारे ब्रिटनचे पंतप्रधान पाहून भारतीयाला त्यांचा अभिमान वाटतो आहे. आपले कर्तव्य हाच आपला धर्म आहे हा विचार पक्का करून ते जोमाने कामाला लागले आहेत दिवस-रात्र मेहनत करत आहेत.

माय मिररचे मनोज अंबिके म्हणाले, ऋषी यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आम्ही एक महिन्यामध्ये पाच आवृत्त्या काढलेल्या आहेत. तरूणांची माागणी या पुस्ताला दिवसेंदिवस वाढत आहे. ऋषी सुनक यांच्या बद्दलचे मराठीतील हे पहिले असल्याने विशेष आकर्षण ठरत आहे. ऋषी आणि अक्षता मुर्तींची लव्हस्टोरी, मुर्ती कुंटुबियांचा साधेपणा लोकांना अधिकचा भावत आहे. याच बरोबर दराडे यांनी अतिशय साध्या सोप्या भाषेत लेखन केले आहें. म्हणून आम्ही हे पुस्तक विविध भाषांमध्ये आणण्याच काम सुरू केले असल्याचे त्यांनी सांगितले.

राजकीय नेत्यांच्या सोशल मिडियावर ऋषी

कमी वयात यशस्वी झालेल्या ऋषी सुनक यांचा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पासून ते पंकजा, धनंजय मुंडे, उदयनराजे भोसले, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, रोहित पवार यांच्या सोशल मिडियावर ही या पुस्ताकाची पोस्ट पहायला मिळाली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com