मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागला
महागाईने सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली आहे. इंधन दरातसुध्दा सातत्याने वाढ होत आहेत. सीएनजी गॅसच्या दरातही वाढ झाली आहे. सध्या सीएनजी गॅसचा दर 80 रुपयांच्या घरात पोहचला आहे. तर याचा राज्यातील बहुतांशी रिक्षा-टॅक्सी या सीएनजी गॅस आधारीत आहेत. त्यामुळे या दरवाढीचा फटका रिक्षा-टॅक्सी चालकांना बसत होता. याच पार्श्वभूमीवर रिक्षा, टॅक्सीचा प्रवास महागणार आहे.
मुंबईत रिक्षा, टॅक्सी भाडेवाढीच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. मुंबईत रिक्षाची दोन रुपयांनी तर टॅक्सीची तीन रुपयांनी भाडेवाढ होणार आहे.. या निर्णयावर सोमवारी शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे 1 ऑक्टोबरपासून मुंबईत रिक्षा,टॅक्सीचा प्रवास महागणार आहे. सरकारकडून भाडेवाढ करण्याबाबत निर्णय न घेतल्यास रिक्षा टॅक्सी चालकांनी 26 तारखेला संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता.
रिक्षाच्या दरात दोन रुपयांनी तर टॅक्सीच्या दरात तीन रुपयांनी वाढ होणार असल्याची माहिती मिळत आहे. 13 सप्टेंबरला मंत्री उदय सामंत यांच्यासोबत बैठकीत निर्णय न झाल्याने संघटनांनी संपाचा पवित्रा घेतला आहे.