Ambulance
Ambulance team lokshahi

आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकेची ही माहिती असणं गरजेचं

किती रुग्णवाहिका उपलब्ध आहेत, जाणून घ्या
Published by :
Shubham Tate
Published on

Ambulance : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत गंभीर काळजी सेवा, बालके आणि गर्भवती महिलांसाठी रुग्णवाहिका सेवा चालवण्यात येते. ज्याचा जेव्हा गरज असेल तेव्हा फायदा घेता येईल. नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत १०२ आणि १०८ नंबर डायल करून रुग्णवाहिका सुविधेचा लाभ घेता येतो. या अभियानांतर्गत देशातील ३५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश रुग्णवाहिका सेवा पुरवत आहेत. (Remember these 2 numbers for ambulance will come in handy in emergency)

राष्ट्रीय आरोग्य अभियानानुसार रुग्णाच्या गरजा लक्षात घेऊन दोन प्रकारची रुग्णवाहिका सेवा दिली जाते. या आधारे रुग्ण आणि त्याच्या कुटुंबीयांना एकाच फोन कॉलद्वारे रुग्णवाहिका सुविधेचा लाभ घेता येईल.

Ambulance
Baby Care : बदलत्या ऋतूत अशा प्रकारे करा बाळाची काळजी, चूक पडेल महागात

रुग्णवाहिकेसाठी हे 2 क्रमांक लक्षात ठेवा -

102 : या अंतर्गत सर्वसामान्य गरजांसाठी रुग्णवाहिका सेवा घेता येणार आहे. याशिवाय गरोदर महिला आणि बालकांच्या उपचारासाठीही या सेवेचा वापर करता येईल. जननी शिशू सुरक्षा कार्यक्रमांतर्गत, अनेक राज्ये पात्र रूग्णाची हॉस्पिटलमध्ये मोफत डिलिव्हरी, दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये रेफर केल्यावर आणि मुलाला आणि आईला मोफत घरी घेऊन जाण्याची सुविधा देतात.

Ambulance
IND vs WI 3rd ODI : विराट कोहलीनंतर शिखर धवनला वेस्ट इंडिजमध्ये इतिहास रचण्याची संधी

108 : याअंतर्गत गंभीर रूग्ण, अपघातात जखमी झालेल्यांना लवकरात लवकर रूग्णालयात पोहोचण्याची सुविधा उपलब्ध आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या वेबसाइटवरून मिळालेल्या माहितीनुसार, देशभरात 108 सेवांसाठी 10,993 रुग्णवाहिका आणि 102 सेवांसाठी 9995 रुग्णवाहिका उपलब्ध आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com