Ayodhya Ram Mandir: अयोध्येत आजपासून धार्मिक विधींना सुरूवात
अयोध्येत आजपासून धार्मिक विधींना सुरूवात होत आहे. 18 तारखेला श्रीरामाची मूर्ती गाभाऱ्यामध्ये स्थापित केली जाणार असून धार्मिक विधी 21 जानेवारीपर्यंत सुरू राहतील, अशी माहिती राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिली. श्रीरामाच्या मूर्तीची 18 जानेवारीला गाभाऱ्यात स्थापना होणार.
अयोध्येत 22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी धार्मिक विधींना आज, मंगळवारपासून प्रारंभ होणार आहे. 18 तारखेला श्रीरामाची मूर्ती गाभाऱ्यामध्ये स्थापित केली जाणार असून धार्मिक विधी 21 जानेवारीपर्यंत सुरू राहतील, अशी माहिती राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सोमवारी दिली. प्राणप्रतिष्ठेच्या मुख्य सोहळ्यात 22 तारखेला दुपारी 12:30 वाजता सुरुवात होईल. हा विधी एक वाजेपर्यंत चालेल. संपूर्ण कार्यक्रम 65 ते 75 मिनिटांचा असेल, अशी माहिती राय यांनी दिली. या सोहळ्याचा मुहूर्त वाराणसीमधील ज्ञानेश्वर शास्त्री द्रविड यांनी काढला आहे. ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे ती पाषाणात घडविलेली असून 18 जानेवारीला ही मूर्ती गाभाऱ्यात ठेवली जाईल.
असे आहे राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचे वेळापत्रक
16 जानेवारी: प्रायश्चित्त आणि कर्मकुटी पूजन
17 जानेवारी : रामलल्ला मूतींचा मंदिर परिसरात प्रदक्षिणा
18 जानेवारी : मंडप प्रवेश पूजा, तीर्थपूजन आणि जलयात्रा, जलाधिवास आणि गंधाधिवास
19 जानेवारी : राम मंदिरात यज्ञ अग्निकुंड स्थापन करण्यात येणार आहे.
20 जानेवारी : राम मंदिराचे गर्भगृह 81 कलशांनी पवित्र केले जाईल, ज्यामध्ये विविध नद्यांचे पाणी जमा करण्यात आले आहे.
21 जानेवारी : या दिवशी, यज्ञविधीमध्ये, विशेष पूजा आणि हवन दरम्यान, रामलल्लाला 125 कलशांसह दिव्य स्नान घालण्यात येईल.
22 जानेवारी : सकाळी 12.29 ते 12:30 पर्यंत राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.