मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!

मोठी बातमी समोर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.
Published by :
shweta walge
Published on

मोठी बातमी समोरआली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाला लोकसभा निवडणुकीत वापरलेलं तुतारी चिन्ह आगामी विधानसभा निवडणुकीत वापरण्यास मान्यता दिली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही शरद पवार गटाचं आता तेच चिन्हं असणार आहे. निवडणूक आयोगाने तशी अधिकृत मान्यता आज पक्षाला दिली आहे. त्यामुळे शरद पवार गटाला खूप मोठा दिलासा मिळाला आहे.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आता कलम 29 ब नुसार देणगी स्वीकारता येणार आहे. यापुढे शरद पवार यांच्या पक्षाला देणगी स्वीकारण्यासाठी अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. निवडणूक आयोगासमोर आज याबाबत सुनावणी पार पडली. या सुनावणीत शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाला देणगी स्वीकारण्यास मान्यता मिळाली आहे.

यावरच खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली, त्या म्हणाल्या की, आज आमच्या चार वेगवेगळ्या महत्त्वाच्या सुनावण्या दिल्लीमध्ये होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, शरद पवारांचा पक्षज्या पद्धतीने काढून घेतला ते पाहता जनतेने आम्हाला आशीर्वाद दिले. त्याबद्दल जनतेचे आभार मानतो. आम्हाला तुतारी हे चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आलं होतं, पण आम्हाला चेक घेण्याचा अधिकार देण्यात आला नव्हता. तसेच कर लाभ सुद्धा मिळत नव्हते. आता आमची विनंती मान्य करण्यात आली आहे.

त्याचबरोबर तुतारी चिन्हावरून होणाऱ्या संभ्रमावस्थेबद्दल होती. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी दुसरी तुतारी देण्यात येऊ नये अशी विनंती केली असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. असा अन्याय इतर कोणत्याही पक्षावर होऊ नये यासाठी विनंती केल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com