रत्नागिरी रिफायनरीसाठी आजपासून सर्वेक्षण; सर्वेक्षणाला परिसरातील ग्रामस्थांचा कडाडून विरोध
रत्नागिरी रिफायनरीचे सर्वेक्षण आजपासून सुरू होणार आहे. सध्या विरोधी नेत्यांची पोलिसांकडून धरपकड होत आहे. काही नेते सध्या अंडरग्राउंड आहेत. त्यामुळे सध्याची संपूर्ण परिस्थिती पाहता होणारा विरोध हा मोठा असेल. मुख्य बाब म्हणजे रिफायनरी सर्वेक्षणासाठी 22 एप्रिल 2023 ते 31 मे 2023 हा कालावधी ठरवण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.
त्यामुळे या सगळ्या परिसरात कलम १४४ म्हणजे जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच या परीसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. २२ एप्रिल ते ३१ मे या कालावधीपर्यंत हे मनाई आदेश लागू असणार आहेत.
'रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोकेमिकल उद्योग' विरोधात काही स्थानिक ग्रामस्थ सक्रिय झाले आहेत. रिफायनरी विरोधी संघटना राजापूर तसेच मुंबई येथे स्थापन झालेल्या आहेत. त्या माध्यमातून ते विरोध दर्शवित आहेत.