पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या अपघाताच्या चौकशीसाठी आज रिफायनरी विरोधक मोर्चा काढणार
कोकणात मुंबई गोवा महामार्गावर राजापूर येथे झालेल्या अपघाताला आता वेगळ वळण मिळाले आहे. रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांच्या विरोधात बातमी देणारे पत्रकार शशिकांत वारीशे यांना गाडीने उडवण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याच पार्श्वभूमीवर पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या अपघाताच्या चौकशीसाठी आज रिफायनरी विरोधक मोर्चा काढणार आहेत.
दरम्यान खासदार विनायक राऊत सकाळी ११ वाजता वारिसे कुटुंबाची भेट घेणार आहेत. वारिसे यांच्या अपघाती मृत्यूची चौकशी करण्याच्या मागणीसाठी सकाळी साडेदहा वाजता रत्नागिरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. खासदार विनायक राऊत देखिल या मोर्चात सहभागी होणार आहेत.
या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे राज्य प्रमुख एस.एम देशमुख यांनी केली आहे.