देशभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात; एवढ्या रुपयांनी झालं स्वस्त

देशभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात; एवढ्या रुपयांनी झालं स्वस्त

देशभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

देशभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्राने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लिटरमागे दोन रुपयांची कपात केली आहे.

आजपासून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर लागू होणार आहेत. या निर्णयामुळे सामान्य नागरिक, वाहतूकदार, व्यावसायिकांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. कालपर्यंत मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 106.25 आणि डिझेल 94.22 होते तर आता 2 रुपये कमी झाल्यानंतर पेट्रोल 104.15 आणि डिझेल 92.10 दर आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com