Maharashtra Rain: हवामान विभागाकडुन आज विदर्भात पावसाचा रेड अलर्ट
विदर्भातील भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर नागपूर जिल्ह्याला काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर खानदेशसह नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात तसेच कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. छत्तीसगड आणि परिसरावर असलेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र वायव्येकडे सरकत आहे. मंगळवारी 10 सप्टेंबरला ही प्रणाली छत्तीसगडच्या विलासपूरपासून 70 किलोमीटर आग्नेयेकडे, रायपूरपासून 140 किलोमीटर पूर्वेकडे, मध्य प्रदेशच्या मालंजखंडपासून 220 किलोमीटर पूर्वेकडे होती. बुधवारी 11 सप्टेंबरला सकाळपर्यंत या प्रणालीची तीव्रता आणखी ओसरणार आहे.
आज 11 सप्टेंबर, बुधवार कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्राच्या नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, पूर्व विदर्भातील अमरावती, नागपूर जिल्ह्यांत जोरदार सरींचा इशारा येलो अलर्ट आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. उद्यापासून 12 सप्टेंबर राज्याच्या बहुतांश भागात पावसाची उघडीप मिळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.