RCB vs LSG, IPL 2024
RCB vs LSG, IPL 2024

'RCB'चा कर्णधार फाफ डुप्लेसिसने सांगितलं पराभवाचं कारण, म्हणाला, "ती चूक भोवली..."

मंगळवारी झालेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या टी-२० सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा २८ धावांनी पराभव केला.
Published by :
Naresh Shende
Published on

मंगळवारी झालेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या टी-२० सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा २८ धावांनी पराभव केला. आरसीबीने लखनौपुढं १५४ धावांचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर मैदानात उतरलेल्या एलएसजीने पाच विकेट्स गमावून १८१ धावा केल्या आणि आरसीबीला पराभूत केलं. आरसीबीसाठी महिपाल लोमरोरने सर्वात जास्त ३३ धावांचं योगदान दिलं. तर एलएसजीसाठी मयंक यादवने चार षटकात १४ धावा देत ३ विकेट्स घेण्याची चमकदार कामगिरी केली.

पराभव झाल्यानंतर कर्णधार फाफ डु प्लेसिस काय म्हणाला?

या सामन्यात झेल सोडल्याची किंमत आम्हाला चुकवावी लागली. पूरन २ धावांवर आणि डिकॉक २५-३० धावांवर होता, त्यावेळी त्यांना जीवदान मिळालं. आयपीएलमध्ये या प्रकारच्या चुका तुम्हाला महागात पडतात. फाफने मयंद यादवबाबत बोलताना म्हटलं, जर त्याच्याकडे वेग आहे, तर याची सवय राहण्यासाठी तुमच्याकडे वेळ पाहिजे.

पण, चेंडूचा वेग आणि अचूक टप्पा फेकण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. आमची गोलंदाजी खूप चांगली झाली नाही, असं मला वाटतं. विशेषत: आम्ही पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी करू शकलो नाही. तुम्हाला दोन खेळाडूंची गरज असते, जे चांगली फलंदाजी करुन भागिदारी करु शकतील. पण आम्ही भागिदारी करण्यात अपयशी ठरलो.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com