आरबीआय आज पतधोरण जाहीर करणार; कर्ज पुन्हा महागणार?

आरबीआय आज पतधोरण जाहीर करणार; कर्ज पुन्हा महागणार?

आज आरबीआयचं पतधोरण जाहीर होणार आहे. आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सकाळी १० वाजता आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (shaktikant Das) पतधोरण जाहीर करतील.
Published by :
Team Lokshahi
Published on

आज आरबीआयचं पतधोरण जाहीर होणार आहे. आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सकाळी १० वाजता आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (shaktikant Das) पतधोरण जाहीर करतील. भारतीय रिझर्व्ह बँकेची द्विमासिक पतधोरण आढावा बैठक 3 ऑगस्ट पासून सुरू झाली आहे. रिझर्व्ह बँकेच्या (RBI MPC meeting) बैठकीचा आज शेवटचा दिवस आहे. रिझर्व्ह बँकेकडून आज नवीन पतधोरण जाहीर केले जाणार आहे. रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास पत्रकार परिषद घेऊन बैठकीतील नवीन निर्णयाची माहिती देतील.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याज दरात 2.25 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्या तुलनेत भारतात आरबीआयने व्याज दरात फारशी वाढ केली नाही. त्यामुळे आरबीआय आणखी व्याज दरात वाढ करण्याची शक्यता आहे. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यास गृह कर्ज, शैक्षणिक, वैयक्तिक, कार कर्ज महागणार आहे. आधीच महागाई वाढली आहे त्यात अजून भर पडण्याची शक्यता आहे.

रेपो दरात 35 ते 50 बेसिस पॉइंट्सची वाढ जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळं गृहकर्जासह सर्व प्रकारची कर्ज महाग होऊ शकतात. आरबीआयकडून 0.50 टक्के व्याजदर वाढवण्याचा अंदाज आहे. आरबीआयने एकाच महिन्यात जवळपास 90 बेसिस पॉईंटची वाढ केली. त्यानंतर आता 5 ऑगस्ट रोजी आरबीआय रेपो दरात 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्याची शक्यता आहे.

आरबीआय आज पतधोरण जाहीर करणार; कर्ज पुन्हा महागणार?
महागाई, बेरोजगारीविरोधात काँग्रेसचं आज देशव्यापी आंदोलन; पंतप्रधानांच्या निवास्थानाला घालणार घेराव
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com