Ravindra Dhangekar : सर्वसामान्य पुणेकर सोडा पुणे पोलिस दलातील कर्मचारी देखील सुरक्षित नाहीत

Ravindra Dhangekar : सर्वसामान्य पुणेकर सोडा पुणे पोलिस दलातील कर्मचारी देखील सुरक्षित नाहीत

पुण्यात महिला वाहतूक पोलिसाला भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

पुण्यात महिला वाहतूक पोलिसाला भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस ठाण्यासमोर शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे.

फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोर देखील या प्रकरणी कारवाई सुरू होती. यावेळी एका वाहनचालकाला अडवण्यात आले असून त्याला कागद पत्र विचारले असता त्याने रागाच्या भरात महिला पोलिस अधिकाऱ्याच्या अंगावर थेट पेट्रोल ओतून त्यांना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे.

यावर आता रविंद्र धंगेकर यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. रविंद्र धंगेकर म्हणाले की, पुण्यनगरीत झालेला हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे.कायद्याचा कुणाला धाक राहिलेला नाही.कायदा सुव्यवस्था सुधारण्यासाठी पुण्यनगरीला सक्षम पोलीस अधिकाऱ्याची गरज आहे,कारण सर्वसामान्य पुणेकर सोडा पुणे पोलिस दलातील कर्मचारी देखील सुरक्षित नाहीत. असे रविंद्र धंगेकर म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com