शिंदे - फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर रवी राणांकडून दिलगिरी
Team Lokshahi

शिंदे - फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर रवी राणांकडून दिलगिरी

अपक्ष आमदार बच्चू कडू व आमदार रवी राणा यांच्या वादात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः उडी घेत काल त्यांच्या सरकारी वर्षा या निवस्थानी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अपक्ष आमदार बच्चू कडू व आमदार रवी राणा यांच्या वादात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः उडी घेत काल त्यांच्या सरकारी वर्षा या निवस्थानी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा उपस्थित होते. रवी राणा आणि बच्चू कडू यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

आमदार रवी राणा यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर गुवाहाटीला जाऊन कोट्यवधी रुपये लाटल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपानंतर बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. तर पैसे घेतल्याचे रवी राणा यांनी पुरावे द्यावेत अन्यथा त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करून असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. यावरुन हा वाद सुरु झाला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत रवी राणा यांनी जवळपास अर्धा तास चर्चा केली. त्यानंतर रवी राणा यांनी बच्चू कडू यांची जाहीर माफी मागितली आहे.

मात्र आता शिंदे - फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर रवी राणा - बच्चू कडू यांच्या वादावर पडदा पडला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर राणा यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, माझ्याकडून कोणी दुखावले गेले असल्यास मी दिलगीरी व्यक्त करतो. मी माझे शब्द मागे घेतो. माझ्यासाठी हा विषय इथेच संपला आहे. राज्याच्या हितासाठी आम्ही हा वाद मिटवला आहे. असे राणांनी म्हटले आहे. यासोबतच बच्चू कडू आणि मी नव्या सरकारचे घटक आहोत. आम्ही दोघेही सरकारसोबत आहोत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com