Ratan Tata Passed Away : उद्योगपती रतन टाटा यांचे निधन
उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले. रतन टाटा यांच्यावर उपचार सुरु असताना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. काही दिवसांपासून रतन टाटा यांच्यावर उपचार सुरु होते. त्यानंतर रतन टाटा यांनी ट्विटवरुन त्यांची प्रकृती चांगली आहे असं सांगितलं होतं. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती.
मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयात त्यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. टाटा समूहाकडून निधनाची बातमी देण्यात आली. रतन टाटा यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी एनसीपीएत ठेवण्यात येणार असून रतन टाटांच्या अंत्यदर्शनासाठी निवडक व्यक्तींना प्रवेश असणार आहे. उद्योग क्षेत्रातील कार्यामुळे तसेच सामाजिक कार्यामुळे रतन टाटा यांचा अनेक पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला होता. रतन टाटांचा महाराष्ट्र भूषण, पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला.
28 डिसेंबर 1937ला मुंबईमध्ये पारशी कुटुंबात जन्म रतन टाटा यांचा जन्म झाला. रतन टाटा यांनी मुंबईतील चॅम्पियन शाळा तसेच शिमलातील बिशप कॉटन आणि न्यूयॉर्क मधील रिव्हरडेल कंट्री शाळेतून शिक्षण घेतलं तसेच न्यूयॉर्कमधीलच कॉर्नेल विद्यापीठातून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. 1990मध्ये टाटा समुहाची सुत्रे हाती घेऊन 1991 ते 2012 आणि 2016 ते 2017 असे दोनदा टाटा समुहाचे चेअरमनपद भूषवलं.
रतन टाटा यांनी 1998 मध्ये भारतातील पहिले स्वदेशी वाहन, टाटा इंडिकाची निर्मिती करुन 2009 मध्ये 1 लाखांत नॅनो लॉन्च करण्यात आली ती म्हणजे सर्वसामान्यांचे चारचाकी घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी. त्यानंतर 2012 मध्ये वयाच्या रतन टाटा यांनी टाटा समूहातून निवृत्ती घेतली.
कसा होता रतन टाटा यांचा जीवनप्रवास
रतन टाटा यांचे पूर्ण नाव - रतन नवल टाटा
28 डिसेंबर 1937ला मुंबईमध्ये पारशी कुटुंबात जन्म
मुंबईतील चॅम्पियन शाळा तसेच शिमलातील बिशप कॉटन आणि न्यूयॉर्क मधील रिव्हरडेल कंट्री शाळेतून शिक्षण
न्यूयॉर्कमधीलच कॉर्नेल विद्यापीठातून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण
1990मध्ये टाटा समुहाची सुत्रे हाती घेतली
1991 ते 2012 आणि 2016 ते 2017 असे दोनदा टाटा समुहाचे चेअरमनपद भूषवलं
1998 मध्ये भारतातील पहिले स्वदेशी वाहन, टाटा इंडिकाची निर्मिती
2009 मध्ये सर्वसामान्यांचे चारचाकी घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 1 लाखांत नॅनो लॉन्च
2012 मध्ये वयाच्या 75 व्या वर्षी टाटा समूहातून निवृत्ती
रतन टाटांचा महाराष्ट्रभूषण, पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कारांनी सन्मान
ऑस्ट्रेलियन सरकारकडून 'ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया' हा पुरस्कार देऊन गौरव