ratan tata funeral
ratan tata funeral

Ratan Tata यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात वरळीच्या पारसी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

वरळीच्या पारसी स्मशानभूमीमध्ये रतन टाटा यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पार्थिव स्मशानभूमीत आल्यानंतर प्रार्थना सभागृहात नेलं जाईल.
Published by :
Team Lokshahi
Published on

वरळीच्या पारसी स्मशानभूमीमध्ये रतन टाटा यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पार्थिव स्मशानभूमीत आल्यानंतर प्रार्थना सभागृहात नेलं जाईल. प्रार्थना सभागृहात जवळपास 200 लोकं जे अगदी जवळचे आहेत तेच अंत्यसंस्कारासाठी असतील. प्रार्थना सभागृहात पारसी पद्धतीने अंत्यविधी पार पडतील. साधारणपणे अर्धा तास प्रार्थना या सभागृहात होईल. शांती प्रार्थना झाल्यानंतर विद्युत दाहिनीमध्ये पार्थिव शरीर ठेवले जाईल. आणि अंत्यसंस्कार विधी पूर्ण होतील. वरळी स्मशानभूमीत टाटांच्या कुटुंबातील व पारसी समाजातील त्यांच्या जवळची लोक व मित्रपरिवार पोहचत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वरळी स्मशानभूमी पोहोचले आहेत.

28 डिसेंबर 1937ला मुंबईमध्ये पारशी कुटुंबात जन्म रतन टाटा यांचा जन्म झाला. रतन टाटा यांनी मुंबईतील चॅम्पियन शाळा तसेच शिमलातील बिशप कॉटन आणि न्यूयॉर्क मधील रिव्हरडेल कंट्री शाळेतून शिक्षण घेतलं तसेच न्यूयॉर्कमधीलच कॉर्नेल विद्यापीठातून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. 1990मध्ये टाटा समुहाची सुत्रे हाती घेऊन 1991 ते 2012 आणि 2016 ते 2017 असे दोनदा टाटा समुहाचे चेअरमनपद भूषवलं.

कसा होता रतन टाटा यांचा जीवनप्रवास

रतन टाटा यांचे पूर्ण नाव - रतन नवल टाटा

28 डिसेंबर 1937ला मुंबईमध्ये पारशी कुटुंबात जन्म

मुंबईतील चॅम्पियन शाळा तसेच शिमलातील बिशप कॉटन आणि न्यूयॉर्क मधील रिव्हरडेल कंट्री शाळेतून शिक्षण

न्यूयॉर्कमधीलच कॉर्नेल विद्यापीठातून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण

1990मध्ये टाटा समुहाची सुत्रे हाती घेतली

1991 ते 2012 आणि 2016 ते 2017 असे दोनदा टाटा समुहाचे चेअरमनपद भूषवलं

1998 मध्ये भारतातील पहिले स्वदेशी वाहन, टाटा इंडिकाची निर्मिती

2009 मध्ये सर्वसामान्यांचे चारचाकी घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 1 लाखांत नॅनो लॉन्च

2012 मध्ये वयाच्या 75 व्या वर्षी टाटा समूहातून निवृत्ती

रतन टाटांचा महाराष्ट्रभूषण, पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कारांनी सन्मान

ऑस्ट्रेलियन सरकारकडून 'ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया' हा पुरस्कार देऊन गौरव

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com