Ranjit Singh Naik Nimbalkar
Ranjit Singh Naik Nimbalkar

माढा लोकसभा मतदारसंघाबाबत रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं मोठं विधान; म्हणाले,"पूर्वी शरद पवार..."

माढा लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीत सध्या खलबतं सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर माढाचे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी माध्यमांशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिलीय.
Published by :
Naresh Shende
Published on

माढा लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीत सध्या खलबतं सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर माढाचे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी माध्यमांशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिलीय. निंबाळकर म्हणाले, प्रत्येक ठिकाणी राष्ट्रवादी आणि आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो आहे. नगरपालिका आणि विधानसभा निवडणुकही एकमेकांच्या विरोधात झाली आहे. या नाराजीवर वरिष्ठ आणि खालच्या स्तरावर चर्चा करून टप्प्याटप्प्याने मार्ग काढायचा आहे. पूर्वी शरद पवार साहेबांनी माढा लढवला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या लोकांचं या ठिकाणी जास्त प्राबल्य आहे. पूर्वी एकमेकांच्या विरोधात झालेले संघर्ष एका क्षणात दूर होत नाहीत, हे सर्व टप्प्याटप्प्यात देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा दूर करतील,अशी अपेक्षा आहे.

धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशाबाबत निंबाळकर म्हणाले, कोणीतरी विरोधात उभा राहतो. परंतु, ही निवडणूक राहुल गांधी पंतप्रधान होणार की नरेंद्र मोदी, अशी आहे. ही निवडणूक माढा पुरती मर्यादित नसून देशाचं राजकारण आणि देशाच्या प्रगतीचा वेग ठरवणारी आहे. त्यामुळे समोरील उमेदवार कोण आहे, यापेक्षा माढा मतदारसंघात मोदींना चांगला प्रतिसाद आहे.

गेल्या तीन वर्षांपासून राष्ट्रवादी सत्तेत आहे. आताही भाजपसोबत सत्तेत आहे. पूर्वीची उणी धुणी प्रत्येक ठिकाणी असतात आणि तसं होत असंत. उमेदवारीसंदर्भात एकमेकांना मदत करण्याबाबत निंबाळकर म्हणाले, अशा प्रकारची सध्या कुठलीही चर्चा नाही. आमदार राहुल कुल आणि मी खूप जवळचे मित्र आहोत. माढामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने मदत करावी, ही त्यांची प्रमुख भूमिका आहे. त्यासंदर्भात अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांची व्यवस्थित चर्चा झाली आहे. अशी कुठलीही भूमिका राहुलदादांनी घेतली नाही, असंही निंबाळकर म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com