रणजीत सावरकर राज ठाकरेंच्या भेटीला
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान विनायक सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता सावरकरांचे नातू रणजीत सावरकर हे सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.
सावरकर इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे. काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीच्या विरोधात जात ते इंग्रजांसोबत काम करायचे. सावरकर तुरुंगातून बाहेर आले तेव्हा खरे सावरकर सगळ्यांसमोर आले. सावरकरांनी इंग्रजांना पत्र लिहिली. त्यानंतर इंग्रजांनी त्यांना सोबत काम करण्याचं आमंत्रण दिलं. सावरकरांनी इंग्रजांसमोर हात जोडले आणि मी आपल्यासोबत काम करायला तयार आहे.तुमच्या अपेक्षेप्रमाणे मी काम करेन, असे राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबद्दल वक्तव्य केलं होत. राज ठाकरे यांनीही भारत जोडो यात्रेत जात राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे आता राज ठाकरे आणि रणजीत सावरकर यांच्या नेमकी कोणती चर्चा होते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.