अजित पवारांना धक्का? रामराजे नाईक निंबाळकर तुतारी हातात घेणार?

आगामी विधानसभा निवडणुकीआधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
Published by :
shweta walge

आगामी विधानसभा निवडणुकीआधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. समरजित सिंह घाटगे यांनी तुतारी हाती घेतल्यानंतर आता अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी तुतारी हाती घेण्याचा इशारा दिला आहे.

भाजपचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामध्ये लोकसभा निवडणुकीपासून शाब्दिक वार सुरू आहेत. फलटण येथे आज आयोजित केलेल्या एका बैठकीत रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपच्या रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या विषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं म्हटलं आहे. गल्लोगल्ली दहशत करणाऱ्या रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या आमदार जयकुमार गोरे यांच्या विषयी आमची तक्रार आहे. त्यांच्या भारतीय जनता पार्टीला साथ देऊ नका. अन्यथा आम्ही तुतारी हातात घेऊ", असा इशारा माजी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी महायुतीतील वरिष्ठांना दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com