Ramdas Kadam
Ramdas KadamTeam Lokshahi

...तर लोक उद्धव ठाकरेंच्या तोंडावर थुंकतील, रामदास कदम असे का म्हणाले ?

बारसू रिफायनरी दौऱ्याची घोषणा केलेल्या उद्धव ठाकरेंचा रामदास कदम यांनी समाचार घेतला.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे हे केवळ दोन वेळाच विधानसभेत गेले ही माहिती शरद पवार यांनी माध्यमांवर सांगितली आहे. त्यामुळे ज्यांना बाप म्हणताय त्यांच्याकडून काही तरी शिका, असा सल्ला शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभा म्हणजे फक्त गद्दार गद्दार म्हणण्यासाठी ओरड असून या थयथयाटाला जनता भीक घालणार नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.

रामदास कदम म्हणाले की, बारसुला रिफायनरी व्हावी यासाठी उद्धव ठाकरे यांनीच प्रस्ताव पाठवला आणि आता बारसुला जाऊन लोकांना भडकवायचं काम देखील उद्धव ठाकरे करणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे हे दुतोंडी गांडूळ किंवा दुतोंडी साप आहेत, अशी टीका रामदास कदम यांनी केली. उद्धव ठाकरे यांचा हा दुतोंडी पणा सर्वांना माहीत आहे त्यामुळे बारसू येथे गेल्यावर उद्धव ठाकरे यांच्या तोंडावर लोक थुंकतील, अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे. महाविकास आघाडीच्या सभेत शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करतानाच आपल्या बारसू रिफायनरी दौऱ्याची घोषणा केलेल्या उद्धव ठाकरेंचा रामदास कदम यांनी समाचार घेतला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com