आज देशभरात ईदचा उत्साह आहे. पवित्र कुराण पहिल्यांदा रमजान महिन्यातच आले होते. प्रेषित मोहम्मद मक्का सोडल्यानंतर मदिना येथे ईद साजरी सुरू झाली. असे मानले जाते.
याच पार्श्वभूमीवर आज पहाटेपासूनच ईदच्या नमाजासाठी मशिदींमध्ये मुस्लीम बांधवांची गर्दी होऊ लागली आहे. लोक एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत आहेत.देशासह जगभरात आज 'ईद-उल-फित्र' म्हणजेच 'रमजान ईद' साजरी केली जात आहे. मुस्लीम बांधवांचा ईद हा अत्यंत पवित्र सण आहे.
काल (21 एप्रिल) संध्याकाळी ईदचा चंद्र दिसल्यानंतर आज सगळीकडे ईदचा उत्साह पाहायला मिळतोय. लोक नवीन कपडे परिधान करतात. शाच्या विविध भागात असलेल्या मशिदींमध्ये ईदची नमाज अदा केली जाते.