Corona रुग्णांमध्ये वाढ; आषाढी वारीबद्दल राजेश टोपेंचं महत्वाचं वक्तव्य
मुंबई : राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. मुंबई, ठाणे, पुणे, पालघरमध्ये परिसरात रुग्णांमध्ये मोठी वाढ होतेय. बाधित होणाऱ्यांपैकी १ टक्के रुग्ण दवाखान्यात दाखल होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मास्क घालण्याचं आवाहन केलेलं आहे, मात्र सक्ती केलेली नाही. तसंच पंढरपुरची वारी देखील होणार असून, त्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही असं राजेश टोपेंनी म्हटलं आहे. त्यांनी यावेळी राज्यातील एक-दोन मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये चाचण्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना रुग्णांमध्ये होणाऱ्या वाढीबद्दल सर्व माहिती उद्धव ठाकरेंना माहिती दिली असल्याचं राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं. indias
राज्यात पुन्हा एकदा कोरोना (corona) रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज रात्री ८ वाजता मुख्यमंत्र्यांसोबत टास्क फोर्स (Task Force) ची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री राज्यातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. राज्यातले रुग्ण वाढल्यास मास्क बंधनकारक करण्याचा विचार करावा लागेल, असं विधान अजित पवारांनी (Deputy CM Ajit Pawar) केलं होतं.
आज रात्री होणाऱ्या या आरोग्य विभागाचे सचिव व वरिष्ठ अधिकारी उपस्थित असणार आहेत. या बैठकीत कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने उपयायोजनांचा आढावा घेतला जाणार आहे. केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांमध्ये आणखी काही निर्देश जारी करण्याबाबत या बैठकीत निर्णय होणार आहे. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय घेतले जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.