Raj Thackeray
Raj ThackerayTeam Lokshahi

ठाण्यात मिळणार 'करारा जवाब'!

आज ठाण्यात राज ठाकरेंची 'उत्तर सभा'
Published by :
Vikrant Shinde
Published on

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) ह्यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणानंतर राज्याच्या राजकारणात एकच धांधल उडाली. राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांवरून (Speakers on mosque) केलेल्या भाष्यावर राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया समोर आल्या. महाविकास आघाडीकडून (MVA Goverment) राज ठाकरेंचा विरोध करण्यात आला तर, भाजपने (BJP in favour of MNS) मात्र कट्टर हिंदुत्वाकडे (hinduism) वळू पाहणाऱ्या मनसेचं स्वागत करण्यात आलं. आज (12-04-2022) ठाण्यात मनसेच्या भव्य सभेत राज ठाकरे भाषण करणार आहेत. त्यामुळे, सर्वांचे लक्ष आता सभेकडे लागले आहे.

सभेची तारीख:

सुरूवातीस मनसेची ही सभा 9 एप्रिल रोजी गडकरी रंगायतन बाहेरील रस्त्यावर होणार होती. मात्र, ह्या ठिकाणी त्याच दिवशी काही पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे पोलिसांनी ह्या सभेस परवानगी नाकारली. त्यानंतर ही सभा गजानन महाराज चौक या ठिकाणी घेतली जाणार होती. परंतू, पोलिसांनी अधिकृत आणि कागदोपत्री परवानगी नाकारल्याने ही सभा आता पुढे ढकलली जाऊन ही सभा आज (12-04-2022) होणार आहे.

आजच्या सभेत नेमकं काय?

ठाण्यातील मनसेच्या आजच्या सभेची चर्चा तारीख जाहीर होताच सुरू झाली असली तरीही, ह्या सभेची चर्चा वाढली ती मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) ह्यांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओनंतर. तो व्हिडीओ म्हणजे मनसेच्या आजच्या सभेचा टीजर. ह्या व्हिडीओमध्ये अजित पवार (Ajit Pawar), शरद पवार (Sharad Pawar) व संजय राऊत (Sanjay Raut) ह्यांनी गुढीपाडवा मेळाव्यानंतर राज ठाकरेंवर केलेल्या टीकेचे व्हिडीओज व त्यानंतर 'करारा जवाब मिलेगा' असा व्हॉईसओव्हर आहे. त्यामुळे आजच्या सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलणार व कोणावर व कश्याप्रकारे निशाणा साधणार ह्याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com