Raj Thackeray
Raj ThackerayTeam Lokshahi

राज ठाकरेंच्या भाषणामुळे नाराज; 16 वर्षांपासून मनसेत असलेल्या पदाधिकाऱ्याचा राजीनामा

राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे पक्षातील मुस्लीम पदाधिकारी नाराज
Published by :
Team Lokshahi
Published on

दौंड | विनोद गायकवाड : राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या (Aurangabad) सभेनंतर राज्याती राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. कधी काळी मराठी अस्मितेच्या मुद्दयावरुन राजकारणात उतरलेल्या राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आता हिंदुत्वादाची शाल पांघरली आहे. यामाध्यमातून राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित करत मुस्लीम समाजाला अल्टीमेटम दिला आहे. यावरुन आक्रमक हिंदुत्वादी (Hinduism) लोकांचं समर्थन राज ठाकरे यांनी मिळवलं असलं तरी, दुसरीकडे पक्षातील मुस्लीम पदाधिकारी मात्र नाराज झाले आहेत.

Raj Thackeray
Raj Thackeray यांच्या विरोधात जालन्यात तक्रार; 'त्या' शब्दामुळे दुखावल्या भावना

राज ठाकरे यांनी भोंग्याचा मुद्दा उपस्थित करताच मनसेतील अनेक मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा औरंगाबादच्या सभेनंतरही राजीनामे येण्यास सुरुवात झाली असल्याचं पाहायला मिळतंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेनंतर 16 वर्षांपासून मनसेत असणाऱ्या दौंडचे शहराध्यक्ष जमीर सय्यद यांनी राजीनामा दिला आहे.

Raj Thackeray
राज ठाकरेंकडून अटींचे उल्लंघन? गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले..

औरंगाबादमध्ये झालेल्या सभेनंतर सोळा वर्षांपासून मनसेमध्ये असणाऱ्या जमीर सय्यद यांनी राजीनामा दिला आहे. सध्या दौंड शहराचे मनसे शहराध्यक्ष असलेल्या जमीर सय्यद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सय्यद हे गेल्या तीन वर्षांपासून शहरअध्यक्ष पदावर काम करत होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com