'धनुष्यबाण ना ठाकरेंच ना शिंदेंचं...' धनुष्यबाण कुणाचं राज ठाकरेंनी थेट सांगितलं
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. दिवाळी संपताच प्रचाराचा धुरळा उडू लागला आहे. डोंबिवलीत मनसेचे कल्याण ग्रामीणचे एकमेव आमदार आणि अधिकृत उमेदवार राजू पाटील यांची प्रचार सभा पार पडत आहे. त्यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी महायुती आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे.
एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडली. त्यांनी या पक्षांचे चिन्ह आणि नाव घेतले. यावर राज ठाकरेंनी म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची नाही तर शिवसेना, धनुष्यबाण ही बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे. असं म्हणत त्यांनी या दोघांवरही टीकास्त्र डागंल आहे.
ते म्हणाले की, विचार नावाची गोष्टच नाहीत उरली. मग हे कॉँग्रेससोबत गेले, अडीच वर्षे संपली. हे इकडे पाहत होते. खालच्या खाली ४० आमदार गेले. मुख्यमंत्र्यांना माहितीच नाही. राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेस सोबत राहणे अवघड होत असल्याचे सांगून एकनाथ शिंदे गेले. मात्र आता अजित पवार पुन्हा जवळ आले. आता काही करता येत नाही. राज्यात अनेक प्रश्न आहे. हे फक्त मजा करत आहेत. हे तुम्हाला गृहीत धरत आहेत.