Raj Thackeray यांची सुरक्षा वाढवली; धमकीनंतर सरकारचा निर्णय
मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे(raj thackeray) यांनी दिलेल्या भोंग्याविषयीच्या अल्टिमेटने राजकारण तापले आहे. या प्रकरणात राज ठाकरे व मनसे नेते बाळ नांदगावकर (bala nandgaonkar)यांना धमकीचे पत्र आले आहे. त्यानंतर बाळ नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतील. या धमकी प्रकरणामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. Y + m सुरक्षितेली पोलिसांची संख्या वाढवली.
राज ठाकरे यांनी धमकी आल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी जोर धरत होती. आता पोलिसांनी या मागणीची दखल घेत त्यांच्या सुरक्षा यंत्रणेत वाढ केली आहे. Y + m सुरक्षितेली पोलिसांची संख्या वाढवली. त्यांच्या सुरक्षेत आता ६ पोलिसांची वाढ झाली आहे. त्यात एक पोलिस अधिकारी आहे.
बाळ नांदगावकर आणि राज ठाकरे यांना धमकीचे पत्र आल्यानंतर बाळ नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधतांना ते म्हणाले की, मला आणि राज साहेबांना जीव मारण्याच्या धमकीचे पत्र आले आहे. हे पत्र उर्दू भाषेत असून त्यात मनसेने सुरु केलेल्या भोंगे आंदोलनामुळे तुम्हाला व राज ठाकरे यांना मारण्याची धमकी दिली आहे. तीनचार दिवसापूर्वी लालबागला माझ्या कार्यालयात मला धमकीचं पत्रं आलं होतं. भोंग्याचा विषय झाल्यापासून आम्हाला धमक्या सुरू आहेत. हे पत्र आल्यानंतर काल पोलीस आयुक्त संजय पांडे यांनाही भेटलो होतो. तसेच ज्वॉईंट कमिश्नर वारके यांची भेट घेतली.