Raj Thackeray Latest News
Raj Thackeray Lokshahi

Raj Thackeray: विधानसभा निवडणुकीसाठी मनसे किती जागा लढवणार? खुद्द राज ठाकरेंनी आकडाच जाहीर केला, म्हणाले...

"येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी मला काहीही करून सत्तेत बसवायचे आहेत"
Published by :
Naresh Shende
Published on

Raj Thackeray Speech : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी मला काहीही करून सत्तेत बसवायचे आहेत. अनेक लोक हसतील, त्यांना हसुदे. मला काही हरकत नाही. पण ती गोष्ट घडणार म्हणजे घडणार. आम्ही सर्वजण तयारीला लागलो आहोत. तुमच्यापर्यंत ही सर्व लोक येतील. त्यानंतर युती होईल का? आपल्याला कोणत्या जागा मिळतील, असा कोणताही विचार मनात आणू नका. जवळपास २२५ ते २५० जागा आपण लढवणार आहोत, असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी एकला चलो रे चा नारा दिला. राज ठाकरे मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते.

राज ठाकरे पुढे म्हणाले, १ ऑगस्टपासून मी महाराष्ट्राचा दौरा सुरु करतोय. ज्यावेळी मी महाराष्टात जिल्ह्यात, तालुक्यात येईल त्यावेळी आपल्या सर्वांची भेट होईलच. आपल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणारच आहे. आपल्या पक्षाचे पदाधिकारी तुमच्याशी चर्चा करतील. त्यानुसार तुम्ही निवडणुकीच्या तयारीला लागा.

मी पक्षातील चा-पाच जणांची एक टीम केलीय. ते तुमच्या जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यात येऊन गेले आणि तिथे त्यांनी सर्वे केला. सर्वांशी विचारपूस करून झाल्यावर आपल्याकडे पहिला सर्वे आला आहे. ते पुन्हा चार पाच दिवसांसाठी जिल्ह्यांमध्ये जाणार आहेत, तेव्हा ते तुम्हाला भेटतील. मूळ परस्थिती काय आहे, ती नीट समजून सांगा. त्या परिस्थितीचं आकलन करा. काय गोष्टींचं गणित होऊ शकत, काय गोष्टी घडू शकतात, याचा नीट विचार करा.

निवडून येण्याची तयारी आणि कुवत असलेल्याच लोकांना तिकीटं दिली जातील. तिकीट मिळालं की मी पैसे काढायला मोकळा, अशा कुणालाही तिकीट दिलं जाणार नाही. जे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आहेत, त्यांच्याकडे जी माहिती आहे, ती नीट प्रामाणिकपणे द्या. कारण तुम्ही दिलेली माहितीही तपासली जाणार, असंही राज ठाकरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com