मंत्रालयात टोलसंदर्भात स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात येणार; राज ठाकरेंच्या बैठकीत मोठे निर्णय
टोलनाक्यांच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यानंतर काल राज ठाकरे यांनी टोलच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. पण या भेटीत काही निर्णायक तोडगा निघाला नाही. त्यामुळे आज पुन्हा या मुद्द्यावर राज ठाकरे यांच्या निवासस्थानी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेण्यात आली.
काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दादा भुसे यांच्यासोबत बैठक झाली. त्यात काही गोष्टी ठरल्या पण लेखी स्वरूपात आल्या नव्हत्या. नंतर मग आज ही बैठक झाली ज्यामध्ये लेखी स्वरूपात काही गोष्टी आल्या आहेत. 9 वर्षानंतर मी सहयाद्रीवर गेलो, त्याच वेळी कळलं होतं की टोल संदर्भातील ऍग्रिमेंट 2026 पर्यत संपणार होते हे मला माहित आहे, 2026 पर्यत ऍग्रिमेंट बँकेसोबत झाल्याने त्यात आता काही करता येत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
ठाण्यातील 5 एन्ट्री पॉईंट्सवर टोल वाढविण्यात आले, अविनाश जाधव यांनी आंदोलन केलं, त्यात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी वक्तव्य केले की चारचाकी आणि तीन चाकी वाहनांना टोल नाही असे ते म्हणाले. लोकांना वाटलं की आम्हला फसवलं जाताय की काय? टोल घेणार असाल तर तुम्ही कोणत्या सोयीसुविधा दिल्या गेल्या आहेत त्यांची अंमलबजावणी झालेली नाही, पुढचे 15 दिवस या सर्व एन्ट्री पॉईंट्स वर सरकार आणि आमच्या पक्षाचे कॅमेरे लावले जातील आणि किती गाड्या या टोल वरून जातात हे कळेल ही व्हिडिओग्राफी उद्या पासून सुरू होईल, असंही राज ठाकरे म्हणाले.