ताज्या बातम्या
नोटबंदीसारखा निर्णय देशाला परवडणारा नाही - राज ठाकरे
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2 हजार रुपयांच्या नोटेवर मोठा निर्णय घेतला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2 हजार रुपयांच्या नोटेवर मोठा निर्णय घेतला आहे. 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढणार आहे. मात्र, ती कायदेशीर निविदा राहील. आरबीआयने बँकांना 2 हजार रुपयांच्या नोटा देणे तात्काळ बंद करण्याच्या सल्ला दिला आहे. रिझर्व्ह बँकेने 'क्लीन नोट पॉलिसी' अंतर्गत हा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2 हजारांच्या नोटा बँकेतून बदलून घेता येतील.
याच पार्श्वभूमीवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नोटबंदीसारखा निर्णय देशाला परवडणारा नाही. असे सरकार चालत नाही. कधीही गोष्ट आणायची बंद करायची. ज्यावेळी त्या नोटा आणल्या तेव्हा त्या एटीएममध्येही जात नव्हत्या. परत तुम्ही नवीन नोटा आणणार. असे राज ठाकरे म्हणाले.