भोंग्यावरुन राजकारण तापणार; 'छेडोगे तो छोडेंगे नही', मनसेला मुंब्र्यातून इशारा
ठाणे प्रतिनिधी | निकेश शार्दुल : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या ठाण्यातील उत्तर सभेतील भोंगे (Azan Loudspeakers) उतरवण्याबाबत 3 मे पर्यंतची मुदत देण्याच्या वक्तव्यावरून आता मुस्लिम समाजात रोष दिसुन येत दिसून येत आहे. त्यातच मुंब्रा (Mumbra) परिसरातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेच्या वतीने मोठ्या संख्येने मस्जिद बाहेर जमून पोलिसांना निवेदन दिलं.
लाऊडस्पीकरला कुणी हात लावला तर आम्ही सोडणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली. आमचा धर्म, आमचे मदरशे, अजाण यांचा काही जणांना त्रास होत आहे. आम्हाला शांतता हवी आहे, मात्र ते अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मुस्लिम पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या वतीने इशारा देण्यात आला आहे. तर राज ठाकरे यांच्या भोंग्या विरोधी वक्तव्यानंतर राज्यभर धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता या संघटनेने वर्तवली आहे.