राज ठाकरेंना आजच अटक होऊ शकते; सुत्रांची माहिती
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray )औरंगाबादच्या (aurangabad)सभेमुळे अडचणीत आले आहेत. या सभेसाठी पोलिसांनी राज ठाकरेंना काही अटी घालून दिल्या होत्या. या अटींचं पालन न केल्यास पोलीस राज ठाकरेंवर कारवाई करणार असा इशाराही देण्यात आला होता. आता त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी (police action)कारवाईस सुरूवात केली आहे. राज यांच्याविरूद्ध औरंगाबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आताच्या घडीला मिळत असलेल्या माहितीनुसार राज ठाकरे यांना आज मध्यरात्रीच अटक होण्याची शक्यता आहे. अचक करण्यासाठी औरंगाबाद पोलिसांचं एक पथक हे विमानाने मुंबईमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १ मे रोजी औरंगाबाद येथे घेतलेल्या सभेत त्यांनी प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या १६ पैकी १२ अटींचा भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.