माफी मागितली तरी राज ठाकरेंना अयोध्येत प्रवेश नाही; बृजभूषण सिंह आक्रमक
मुंबई : मराठी अस्मितेचा मुद्दा बाजुला सारत हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन नव्यानं मैदानात उतरलेल्या राज ठाकरेंना आता अनेक आव्हानांचा सामना करावा लागतोय. राज ठाकरे यांनी गुडीपाडव्याच्या सभेतून सुरु केलेल्या या इनिंगनंतर ठाणे, पुणे, औरंगाबादमध्ये झालेल्या सभा आणि कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता राज ठाकरे यांच्या अयोध्या (Ayodhya) दौऱ्याला वारंवार आव्हान दिलेल्या बृज भुषण सिंह (Brij Bhushan Singh) यांनी आता पुन्हा एकदा राज ठाकरेंना (Raj Thackeray) इशारा दिला आहे. राज ठाकरेंनी आता माफी मागितली तरी त्यांना 5 जूनला अयोध्येत प्रवेश नाही असं जाहीर केलं आहे. त्यामुळे आता मनसे नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
राज ठाकरेंनी मराठी अस्मितेच्या मुद्दयाला घेऊन परप्रांतीय लोकांना त्रास दिला, त्यामध्ये अनेक उत्तर भारतीयांना त्यांनी त्रास दिला होता. रोजगारासाठी, शिक्षणासाठी, उपचार घेण्यासाठी आलेल्या उत्तर भारतीयांना त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हाकलून लावलं होतं. अनेक उत्तर भारतीयांना त्यांनी मारहाण देखील त्यांनी केली. त्यामुळे राज ठाकरे उत्तर प्रदेशमध्ये पाय ठेवू शकणार नाही. ते विमानातून इथपर्यंत आले तरी त्यांना जमिनीवर आम्ही पाय ठेवू देणार नाही. त्यांनी आधी मागावी मग अयोध्येला यावं असं बृज भुषण सिंह म्हणाले होते. त्यानंतर आता भाजप खासदार बृज भुषण सिंग यांनी आणखी आक्रमक भुमिका घेतली आहे.
राज ठाकरेंनी आता माफी मागितली तरी ते येत्या 5 जुनला अयोध्येत येवू शकणार नाही असं बृज भुषण सिंह यांनी स्पष्ट केलं आहे. बृज भुषण सिंह यांनी या मुद्दयाला धरुन लाखो लोकांना अयोध्येला येण्याचं आव्हान केलं आहे. त्यांच्या बैठकींना प्रतिसाद देखी मोठ्या प्रमाणात मिळतोय. याच पार्श्वभूमीवर त्यांनी आज सांगितलं की, राज ठाकरेंनी माफी मागितली तरी त्यांन 5 जुनला अयोध्येत येता येणार नाही. लाखो लोक त्या दिवशी अयोध्येत असतील, त्या गर्दीत राज ठाकरे अयोध्येत प्रवेश करु शकणार नाही असं बृज भुषण सिंह म्हणाले.