Mumbai Rain: मुंबई शहर आणि उपनगरांत पावसाचा आजही जोर
मुंबईत सध्या जोरदार पाऊस पडत आहे. या जोरदार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीवर आणि रस्ते वाहतुकीवर पडण्याची शक्यता आहे. सकाळपासूनच जोरदार पाऊस पडत आहे. पण मात्र पुढील काही तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने मुंबईसाठी अंदाज वर्तवलेला आहे.
सध्या मुंबई जोरदार पावसासह जोरदार वारे वाहत आहे. मात्र. या पावसामुळे रेल्वे काहीशी उशिराने धावत आहे. यासोबतच सीएसएमटी स्थानकात रेल्वे रुळावर हळूहळू पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मध्यरात्री विश्रांती घेतलेल्यानंतर पहाटेपासून पावसाची रिमझिम सुरु आहे. मुंबईत काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी उपनगरात मध्यम पाऊस अधून मधून पाहायला मिळतोय.
मुंबईत सध्या सखल भागात कुठेही पावसाचं पाणी साचले नाही. पाऊस असल्याने रस्ते वाहतूक नेहमीप्रमाणे संथ गतीने आहे. तर लोकल या काही मिनिटांनी उशिराने सुरु आहेत. काल हवामान विभागाने मुंबई मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता.