रेल्वेचा मोठा निर्णय, आता स्थानकांवर चौकशी काउंटर नसणार, पण...
indian railways : रेल्वे मंत्रालयाने सोमवारी मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार स्थानकांमधील चौकशी काउंटरचे नाव बदलण्यात आले आहे. या काउंटरचे नाव आता 'सहयोग' असेल. येथे प्रवाशाला मदत मिळू शकते. रेल्वे बोर्डाने सर्व विभागीय रेल्वेंना याबाबतचे आदेश जारी केले आहेत. (indian railways inquiry counter renamed delsp)
याबाबतचा आदेश रेल्वे मंत्रालयाने आज जारी केला आहे. सर्व भारतीय रेल्वेच्या सर्व जीएमना आदेश पाठवण्यात आले आहेत. हा आदेश रेल्वे बोर्डाच्या पॅसेंजर मार्केटिंगचे कार्यकारी संचालक नीरज शर्मा यांनी जारी केला आहे.
हा आहे आदेश
रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, चौकशी बूथवर केवळ चौकशीचे काम केले जात नाही. अनेक ठिकाणी बूथवर व्हील चेअर उपलब्ध असून प्रवाशांना योग्य मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे प्रवाशांना आधार मिळतो. हे लक्षात घेऊन त्याचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता स्थानकांवर चौकशी काउंटर किंवा बूथऐवजी 'सहयोग' काउंटर दिसणार आहेत.