खऱ्याखुऱ्या टीसी ने फोडले बनावट टीसीचे बिंग, कल्याण रेल्वे पोलिसांनी केली दोघांना अटक
अमजद खान|कल्याण: टीसी असल्याचे सांगून प्रवाशांचे ति तिकीट चेक करणाऱ्या दोन भामट्यांना कल्याण रेल्वे पोलिसांनी खऱ्याखुऱ्या टीसीचा मदतीने बेड्या ठोकल्या आहेत. संदीप पवार आणि रोहिदास गायकवाड अशी या आरोपींची नावे आहेत. दोघे कधीपासून रेल्वेची फसवणूक करीत आहेत, याचा तपास आता पोलीस करीत आहेत.
रविवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास कसारा रेल्वे स्थानकातील फलट क्रमांक चारवर रेल्वे कॅन्टीनच्या समोर दोन टीसी प्रवासाचे तिकीट चेक करत होते. एक टीसी ची नजर या दोघांवर गेली. दोघे स्वतःला टीसी असल्याचे सांगत होते. मात्र दोघांची वागणूक संशयित होती. या दोघांकडून आयकार्ड चेक केलं गेलं हे आय कार्ड डुप्लिकेट असल्याचे लक्षात आले. यांच्याकडे इतर काही बनावटी कागदपत्र सापडले. दोघे स्वत:हा टीसी असल्याचे सांगत प्रवाशांची तिकीट चेक करण्याच्या बाहण्याने फसवणूक करत होते.
माहिती मिळताच कल्याण रेल्वे पोलिस दाखल झाले. रेल्वेची फसवणूक केल्या प्रकरणी पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. संदीप पवार आणि रोहिदास गायकवाड दोघे कल्याण पूर्वेतील तिसगाव परिसरात राहतात. हे दोघे कधीपासून असा प्रकारे रेल्वेची फसवणूक करीत होते याच्या तपास कल्याण जीआरपीच्या महिला पोलीस अधिकारी अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. याआधी अनेक भामट्यांना कल्याण जीआरपीने अटक केली आहे.