Rail Ticket Reservation:रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! रेल्वे आरक्षणाच्या नियमांमध्ये मोठे बदल; जाणून काय आहेत "हे" बदल...
रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. रेल्वे आरक्षणाच्या नियमांमध्ये रेल्वे प्रशासनाकडून मोठे बदल केल्याचं समोर आलं आहे. प्रशासनाने केलेल्या बदलांनुसार आता रेल्वेचे तिकीट 60 दिवसांआधीच काढता येणार आहे तर परदेशी पर्यटकांना 365 दिवसांच्या मर्यादेत कोणताही बदल नाही असे सांगण्यात आले आहे. हे नियम 1 नोव्हेंबर 2024 पासुन लागू होणार आहेत. तर आता रिझर्व्हेशन करण्याचा कालावधी 120 दिवसांवरुन 60 दिवसांवर केला गेला आहे.
120 दिवसापर्यंतच्या बुकिंगचा नियम ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत लागू होईल. तसेच 60 दिवस आधी बुकिंग केलेल्या रिझर्व्हेशन रद्द करण्याची परवागी देखील असेल. तर नवीन लागू केलेल्या नियमांमुळे उत्तर प्रदेशच्या पूर्वेकडे जाणाऱ्या आणि बिहारमध्ये जाणाऱ्या प्रवासांना अडचणींना समोरे जाण्याची शक्यता आहे. ज्या रेल्वे गाड्यांच्या बुकिंगचा कालावधी आधीपासून कमी आहे.
अशा गाड्यांना हा नियम लागू असणार नसून यात ताज एक्स्प्रेससह गोमती एक्स्प्रेसचा समावेश आहे. हा निर्णय घेण्या मागचं कारण अद्याप रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलेला नाही तरी, प्रवाशांकडून प्रवासाच्या चार महिन्या आधी केल्या जाणाऱ्या बुकिंग रद्द केल्या जातात. आता हा निर्णय घेतल्यामुळे दोन महिन्या आधी बुकिंग केल्याने तिकीट रद्द होण्याची शक्यता कमी होऊ शकेल त्यामुळे हा नियम लागू केला गेला आहे असा अंदाज लावला जात आहे.