Raigad: नेरळ येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणाचा उलगडा समोर!
कर्जत तालुक्यातील नेरळ परिसरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या तिहेरी हत्याकांडाने रायगड जिल्ह्यात खळबळ निर्माण झाली होती रायगड पोलीसांनी अवघ्या दोन दिवसांत या हत्याकांडाचा उलगडा करून आरोपीस बेड्या ठोकल्या. घर नावावरती करून देत नाही व रेशनकार्ड वरील नाव वेगळे करत नाही या रागात सख्याभावानेच भाऊ, त्याची गर्भवती पत्नी व पुतण्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे. तीन मृतदेह आढळून आले होते मृतदेहांच्या अंगावर जख्मा असल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी पोलीसांनी मयत मदन याचा भाऊ हनुमंत जैतु पाटील याला ताब्यात घेऊन सखोल तपास केला असता हनुमंत यानेच हे हत्याकांड कल्याचे निष्पन्न झाले आहेत.
मदन व हनुमंत हे सख्ये भाऊ शेजारी रहात होते हनुमंत याला घर व रेशनकार्ड स्वतंत्र करून हवे होते मात्र मदन ते करून देत नसल्याने त्यांच्यात नेहमी वाद होत असे याबाबत अनेकदा तक्रारी देखील करण्यात आल्या होत्या. तिघांची हत्या करण्यापूर्वी हनुमंत याने पोशिरे गावातील मामाकडे गेल्याचा बनाव केला होता मध्यरात्री तो पोशिरे येथून चिकनपाडा येथे आला व तिघांची निर्घृण हत्या करून मृतदेह नाल्यात फेकून दिली. पोलीसांच्या हाती लागलेल्या सिसिटिव्ही फुटेज व कपड्यांवरून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
यावर रायगड पोलीस म्हणाले की, पोलीसपाड्याच्या हद्दीमध्ये एक चिकनपाडा गाव आहे त्याठिकाणी तिहेरी हत्याकांड झालं होत. एकाच घरातल्या तीन जणांचे मृतदेह हे ओढ्यामध्ये मिळालेले होते. त्याचा तपास कर्जत डिव्हीदजनचे एचडीपीओ यांच्याकडून ज्यावेळी तपास करण्यात आला त्या तपासातून समोर आले की, जो मृतक आहे त्याचा भाऊ हनुमंत यानेच आपला सख्खा भाऊ त्याची पत्नी आणि त्यांचा 11 वर्षाचा मुलगा या तिघांना रात्री झोपेतच कुऱ्हाडीने मारून टाकलं. तसेच पुरावे नष्ट करण्यासाठी घराच्या मागच्या ओढ्यात ते तिन्ही मृतदेह फेकून दिले. या घटनेदरम्यान आरोपीचा काही ही संबंध नाही असं दाखवण्यासाठी आरोपी जवळच त्याच्या मामाच्या गावी गेला होता. पण सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी दिसून आला.