ताज्या बातम्या
विधानसभा निवडणुकीसाठी रायगड पोलीस सज्ज
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष तयारीला लागले आहे.
भारत गोरेगावकर, रायगड
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. यातच काल निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या.
याच पार्श्वभूमीवर आता विधानसभा निवडणुका व्यवस्थित पार पडाव्यात यासाठी रायगडच्या पोलीस यंत्रणेने तयारी केल्याचे पाहायला मिळत आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने राज्य पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
जिल्ह्यात 2 हजार 600 पोलीस कर्मचारी, 500 होमगार्ड, तसेच केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 5 कंपन्या तैनात केल्या जाणार असल्याची माहिती मिळत आहे. या कालावधीत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे अशी माहीती पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.