वर्ध्यात क्रिकेट जुगार अड्ड्यावर धाड, 25 लाखाचा मुद्देमाल जप्त 20 जणांवर गुन्हा दाखल
भूपेश बारंगे,वर्धा: शहरातील फुलफैल परिसरात ऑस्ट्रेलिया या देशात बिग बॅश क्रिकेट 20 -20 मॅचवर ऑनलाइन पैश्याची हारजीत चालवीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळताच धाड घातली. यात दोघांना अटक केली असून 18 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईने क्रिकेट बाजारात खळबळ उडाली आहे.
बिग बॅश क्रिकेट 20-20 मॅचवर मेलबर्न क्रिकेट स्टेडियम, ऑस्ट्रेलिया येथे मेलबर्न स्टार विरुद्ध सिडनी थंडर या दोन संघा दरम्यान क्रिकेट सामना सुरू होता. यावेळी निखिल पंजवानी रा.दयाल नगर, वर्धा हा कच्चीलाईन ऑटो स्टँड जवळ सार्वजनिक ठिकाणी उभा राहून आसिफ शेख यांच्या सांगण्याप्रमाणे सदर क्रिकेट सामन्यावर जुगार खेळ खेळत असल्याच्या माहितीच्या आधारे नाकेबंदी करून क्रिकेट जुगार अड्ड्यावर धाड टाकली. त्यांच्या ताब्यातून 25 लाख 57 हजार 500 मुद्देमाल जप्त केला. यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे नऊ मोबाईल, हुंडाई कंपनीची अलकलाईझर कार, नगद 24 हजाराची रोकड जप्त केली आहे. या अवैध क्रिकेट बाजारात जवळपास 20 जणांवर गुन्हा दाखल केले असून यामध्ये आरोपी आसिफ शेख मेहबूब शेख, निखिल माधवदास पंजवानी, जय भगत, शम्मू शेठ, फारूक केळझर, शाम चवरे, शहिद भैया, सूरज नगराळे, सतीश, चिरंजीव, संदीप वानखेडे, प्रशांत डेकाटे, समीर माडिया, विवेक पाटमासे, अंड्डा दिनेश पंजवानी, हसीम शहा, कटटिंग, लखन उर्फ जयसिंग चव्हाण, महादेव सेलू यांच्यावर मोबाईल नंबर वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत ज्यांच्याकडे पैश्याची लागवड केली जाते, त्यांच्या मुख्य आरोपी शोध घेतले जाणार असल्याची पोलीस सूत्रांनी दिली आहे. या कारवाईत आसिफ शेख मेहबुब शेख हा आपल्या कारने शहरात फिरत या व्यवसाय करत असतो अशी माहिती देण्यात आली. पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक करडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, उपनिरीक्षक बालाजी लालपालवाले,
पोलीस अमलदार गजानन लामसे, हमीद शेख, चंद्रकांत बुरंगे, यशवंत गोल्लर, श्रीकांत खडसे, राजेश जयसिंगपुरे, मनीष कांबळे, गोपाल बावनकर, अखिल इंगळे सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.