'संविधान सिर्फ बहाना है लाल पुस्तक को...' भाजपकडून व्हिडिओ ट्विट करत दावा
थोडक्यात
नागपूरमध्ये 6 नोव्हेंबरला संविधान सन्मान संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी प्रमुख उपस्थित होते.
नागपूरमधील भट सभागृहात संविधान सन्मान संमेलनात राहुल गांधी यांनी संविधानाचा दाखला देत केंद्र सरकारवर कडाडून टीका केली.
भाजपने राहुल गांधी यांच्या भाषणावर प्रतिक्रिया व्यक्त करत, लाल पुस्तकाला संविधान म्हणून संबोधले जाते, पण त्या पुस्तकात फक्त कोरी पाने आहेत, ते संविधान नाही, असा दावा केला.
नागपूर येथे 6 नोव्हेंबरला संविधान संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राहुल गांधी यांनी यांनी प्रमुख उपस्थितीत लावली आहे. नागपुरातील भट सभागृहात संविधान सन्मान संमेलनात काँग्रेस नेते राहुल गांधी आज संविधानाचा दाखला देत सरकारवर कडाडून टीका केली आहे. यावरुनच राहुल गांधी जे लाल पुस्तकाला संविधान म्हणून संबोधतात पण त्या लाल पुस्तकात फक्त कोरी पाने आहेत ते संविधान नाही असा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.
भाजपकडून एक ट्विट करण्यात आलं आहे ज्यात राहुल गांधींचं संविधान पुस्तक हे कोरं असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींचा भाजपकडून निषेध देखील करण्यात आला आहे.
भाजपच ट्विट
संविधान सिर्फ बहाना है लाल पुस्तक को बढ़ाना है मोहब्बत के नाम पर सिर्फ नफरत फैलाना है... काँग्रेसला भारताचे संविधान असेच कोरे करायचे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले सर्व कायदे अनुच्छेद वगळून टाकायचे आहेत. म्हणूनच तर राहुल गांधींनी मध्यंतरी आरक्षण रद्द करणार ही भविष्यवाणी केली होती.
लक्षात ठेवा, श्रध्देय डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं संविधान हा निवडणुकीचा मुद्दा नाही तर भारताचा आणि भारतीयांच्या जगण्याचा पाया आहे. त्यामुळे संविधान विरोधी कॉग्रेसला जनताच धडा शिकवेल... संविधानाच्या मारतात बाता काँग्रेसचा एकूण विषयच खोटा