Rahul Gandhi MVA Manifesto Mahalaxmi Yojana : महायुतीच्या 'लाडकी बहीण' योजनेला टक्कर, मविआकडून महिलांना 3 हजार

Rahul Gandhi MVA Manifesto Mahalaxmi Yojana : महायुतीच्या 'लाडकी बहीण' योजनेला टक्कर, मविआकडून महिलांना 3 हजार

महाविकास आघाडीच्या मुंबईतील सभेत राहुल गांधी, शरद पवार आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत महिलांसाठी 3 हजार रुपये देणारी 'महालक्ष्मी योजना' जाहीर.
Published by :
shweta walge
Published on

महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांची आज मुंबईत बिकेसी येथे जाहीर सभा पार पडली आहे. महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांसह राहुल गांधीआणि मल्लिकार्जुन खर्गे हे देखिल उपस्थित होते. या सभेत मविआकडून विधानसभेसाठी पंचसूत्री जाहीर करण्यात आलं आहे. यातील पहिलं आश्वासन हे महालक्ष्मी योजनेचं आहे. या योजनेअंतर्गत महाविकास आघाडी सरकार राज्यातील महिलांना दर महिन्याला प्रत्येकी 3 हजार रुपये आणि बसप्रवास मोफत करणार आहे. राज्य सरकार प्रत्येक कुटुंबाला 25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा देणार आहे, तसेच मोफत औषधे देखील देणार आहे. या योजनेचं नाव कटुंब रक्ष योजना असं देण्यात आलं आहे.

मविआकडून महाराष्ट्राला 5 गॅरेंटी

  • महालक्ष्मी योजनेतून महिलांना ३ हजार देणार

  • महिलांसाठी मोफत बससेवा

  • युवकांना ४ हजार देणार

  • कुटुंबासाठी २५ लाखांचा आरोग्य विमा

  • शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देणार

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांनी केलेल्या 2100 रुपयांपेक्षा 900 रुपये जास्त रक्कम लाडक्या बहि‍णींना देण्यात येणार असल्याचं महाविकास आघाडीने जाहीर केले आहे. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com