Rahul Gandhi, Devendra Fadnavis
Rahul Gandhi, Devendra FadnavisTeam Lokshahi

'राहुल गांधींना भारताचा इतिहासच माहिती नाही' देवेंद्र फडणवीस

फडणवीसांनी केला राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध
Published by :
shweta walge
Published on

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निषेध केला आहे. काँग्रेसकडून वारंवार सावरकरांचा अपमान सुरू आहे. त्यानंतरही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला पाठिंबा देणार का?, असा सवालही यावेळेस फडणवीसानीं उपस्थित केला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी सात्यत्याने स्वा. सावरकरांबद्दल बोलत आहे. स्वा.सावरकरांना काँग्रेसने वारंवार अपमानीत करण्याचे काम केले. याचे कारण आहे की, सावरकरांच्या मागे देशातील जनता मोठ्या प्रमाणात होती. स्वातंत्र्यानंतरच्या राजकीय परिस्थितीत जाणीवपूर्वक त्यांना अपमानित करण्यात आले. काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारे अगदी कमी लोक होते. सावरकरांनी अनेक क्रांतीकारकांना मोठी प्रेरणा देत अनेक क्रांती कारकांना मोठे केले होते. मात्र राहुल गांधी त्यांचा अपमान करतात कारण त्यांना सावरकरांचा आणि देशाचा इतिहास माहिती नाही असं वक्तव्य फडणवीसांनी यावेळेस केले आहे.

पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे राहूल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करणार की, भारत जोडो यात्रेला येणाऱ्या राहुल गांधींच्या स्वागतासाठी आपल्या कार्यकर्त्यांना पाठविणार असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. राहुल गांधींच्या वक्तव्याचे समर्थन उद्धव ठाकरे करणार का याचे उत्तर त्यांनी द्यावे असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. भारतीयांच्या मनात सावरकरांकबद्दल असलेली प्रतिमा कधीच मिटू शकणार नाही, राहुल गांधींनी असे कितीही प्रयत्न केले तरी सावरकरांबद्दलचे विचार बदलू शकणरी नाही.

स्वातंत्र्ययुद्धात सावरकर इंग्रजांसाठी काम करत होते. त्यांना इंग्रजांकडून त्याचा मोबदलाही मिळत होता असं वक्तव्य भारत जोडो यात्रेला 1 महिना पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी कर्नाटकच्या तिरुवेकरे येथे एका 34 मिनिटांच्या पत्रकार परिषदेला संबोधित केले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com