मीडियाच्या समर्थनाशिवाय मोदी पंतप्रधान होऊ शकले नसते- Rahul Gandhi
आज रामलीला मैदानात काँग्रेसद्वारे केंद्र सरकार व महागाईविरुद्ध आंदोलन करण्यात आलं. या आंदोनाचं नेतृत्व राहूल गांधी यांनी केलं. त्यावेळी बोलताना राहूल गांधी यांनी भाजप व भाजपच्या आर्थिक धोरणावर निशाणा साधला. तर, सर्वसामान्य नागरिकांना महागाईमुळं जगणं मुश्किल झालं असल्याचंही ते म्हणाले.
राहुल गांधी यांनी मांडलेले 10 महत्त्वाचे मुद्दे:
मला 55 तास ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागलं
मी ईडीच्या दबावाला घाबरत नाही
मोदी सरकार देशाला वाटून निवडक लोकांच्या फायद्यासाठी काम करत आहे
मोदी सरकारच्या काळात देशातील 2-3 व्यावसायिकांनाच फायदा होतोय
मोदींनी शेतकऱ्यांना 3 काळे कायदे दिले
देशाने आतापर्यंत इतकी महागाई पाहिली नव्हती
मोदी सरकार विरोधी पक्षातील लोकांना सभागृहात बोलू देत नाही
मीडिया आपलं मुळ काम विसरून मोदी सरकारच्या दबावाखाली काम करत आहे
मोदींनी ज्यांना मोठं केलं त्याच 2 उद्योगपतींच्या हातात मीडिया आहे
देशात बेरोजगारी, महागाई अश्या समस्या आहेत