Rahul Gandhi Vs. PM Modi
Rahul Gandhi Vs. PM ModiTeam Lokshahi

"मोदींचं राज्य सहकार्याचं नाही, जबरदस्तीचं", राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

इंधन दरवाढीवरून सध्या देशात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
Published by :
Vikrant Shinde
Published on

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बोलावलेल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये केंद्र सरकारकडून सर्व राज्यांतील सरकारला काही सल्ले देण्यात आले. त्या सल्ल्यांपैकी महत्त्वाचा व उल्लेखनीय सल्ला म्हणजे केंद्र सरकारने राज्य सरकारला इंधनावरील व्हॅट कमी करण्याचा सल्ला देण्यात आला. ह्या स्ल्ल्याच्या पार्श्वभुमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आता केंद्रातील मोदी सरकारवर पलटवार केला आहे.

केंद्र हे केवळ राज्यांवर आपली जबाबदारी ढकलण्याचे एकमेव काम करत आहे. अश्या शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी ट्वीट करत केंद्र सरकारवर ही टीका केली आहे.

नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?

राज्यांवर जबाबदारी ढकलणे केंद्राचे एकमेव काम

इंधनाच्या वाढत्या दराचा दोष राज्यांना

कोळसा टंचाईचा दोषही राज्यांनानाच

ऑक्सिजन कमतरतेतही राज्यांनाच दोष

68% इंधन कर केंद्राच्या तिजोरीत जातो

इंधनावर 68% करवसुली करुनही PM जबाबदारी ढकलतात

मोदींचं संघराज्य सहकार्याचं नाही तर, जबरदस्तीचं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com