थेट लालू यादवांसाठी राहुल गांधी बनले स्वयंपाकी; चंपारण मटण पाहून लालू झाले खुश

थेट लालू यादवांसाठी राहुल गांधी बनले स्वयंपाकी; चंपारण मटण पाहून लालू झाले खुश

हुल गांधी चर्चेत येण्याचे कारण ठरले ते म्हणजे यावेळी त्यांनी राष्ट्रीय जनता दल प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यासोबतच्या खास मुलाखतीचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये दोन्ही नेते मटण बनवताना दिसत आहेत.
Published on

काँग्रेस नेते राहुल गांधी नेहमी वेगवेगळ्या कृतीमुळे कायम चर्चेत असतात. ते कधी थेट शेतात जाऊन शेती करतात तर कधी ट्रक चालक बनण्याचा आनंद घेता. मात्र यावेळेस त्यांनी विशेष काही केले आहे. यावेळेस राहुल गांधी चर्चेत येण्याचे कारण ठरले ते म्हणजे यावेळी त्यांनी राष्ट्रीय जनता दल प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यासोबतच्या खास मुलाखतीचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये दोन्ही नेते मटण बनवताना दिसत आहेत.

राहुल गांधी यांनी लालू प्रसाद यादव यांच्यासोबतच्या खास मुलाखतीचा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. यामध्ये दोन्ही नेते राजकीय 'मसाल्यां'वर चर्चा करताना दिसत आहेत. लालू प्रसाद यादव यांनी राहुल गांधी यांना खास रेसिपीचं बनवलेलं मटण खाऊ घालताना आणि राजकीय मसाल्यांचा अर्थ समजावून सांगितला. यासोबतच अन्यायाविरुद्ध लढत संघर्ष करण्यासाठीही सांगितलं.

राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर अकांटवर खास व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'लोकप्रिय नेते, लालूजी यांच्याशी त्यांची खास रेसिपी आणि 'राजकीय मसाला' यांवर मनोरंजक संभाषण. गरीब, वंचित, अल्पसंख्याक आणि महिलांसाठी भारताची दृष्टी एक आहे - समानता, प्रगती आणि सक्षमीकरण. लालूजींसोबतच्या माझ्या खास भेटीचा संपूर्ण व्हिडीओ यूट्यूबवर पाहा.'

राहुल गांधी यांनी शनिवारी लालू प्रसाद यादव यांच्यासोबतच्या भेटीचा व्हिडीओ यूट्यूबवरही प्रसिद्ध केला आहे. दोन्ही नेते मटण बनवत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. दिल्लीतील राज्यसभा सदस्य आणि लालू प्रसाद यांची कन्या मीसा भारती यांच्या निवासस्थानी राहुल गांधी यांनी लालू प्रसाद यादव यांची भेट घेतली. यावेळी दोघांनी मटण तयार केलं. व्हिडीओमध्ये बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव म्हणतात की, त्यांनी हे मटण बिहारहून मागवलं आहे.

थेट लालू यादवांसाठी राहुल गांधी बनले स्वयंपाकी; चंपारण मटण पाहून लालू झाले खुश
मुख्यमंत्रीपदाबाबत प्रफुल्ल पटेल यांचा मोठा गौप्यस्फोट; चर्चांना उधाण
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com