Pune| खोटी कागदपत्रे तयार करून जमिनीचे व्यवहार करणाऱ्यानां पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Team Lokshahi

Pune| खोटी कागदपत्रे तयार करून जमिनीचे व्यवहार करणाऱ्यानां पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे (Pune) पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने खोटी कागदपत्रे तयार करून जमीन खरेदी विक्री करणाऱ्या सात जणांच्या टोळीला अटक केली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

पुणे (Pune) पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बनावट मतदान ओळखपत्र तयार करून जमीन खरेदी विक्री करणाऱ्या सात जणांच्या टोळीला अटक (Arrested) केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार यातील मुख्य आरोपी हा एक प्रॉपर्टी एजंट असून तो मोबाईलच्या साहाय्याने म्हणजेच गुगल मॅपच्या (Google Map) साहाय्याने शहर आणि परिसरातील दुर्लक्षित जमिनींचा आणि भूखंडांचा शोध घ्यायचा आणि त्या जमीन मालकांच्या मिसिंग किंवा मयत असल्याची खात्री झाल्यास लगेच त्या जागेचे सरकारी कागद सरकारी कार्यलयातून मिळवून त्या जमिनींची परस्पर विक्री केली जात होती.

Pune| खोटी कागदपत्रे तयार करून जमिनीचे व्यवहार करणाऱ्यानां पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Pune : धक्कादायक! पोटच्या मुलाला दोन वर्षे कुत्र्यांसोबत कोंडले

या सात जणांच्या टोळीचा प्रमुख कल्पेश रमेश बोरा (Kalpesh Ramesh Bora) हा असून याला पोलिसांनी याला आधीच अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने कल्पेशसोबतच उमेश जगन्नाथ बोडके (राहणार नारायणवाडी कल्याण (पश्चिम) वय ४७) , अमोल गोविंद ब्रम्हे(राहणार राजाराम पुलाजवळ, सिंहगड रोड, पुणे वय ५८), सचिन दत्तात्रय जवळकर ((ईगल सोसायटी कोथरूड पुणे वय ४१), सय्यद तालिब हुसेन सय्यद जमीन हुसेन (राहणार खामगाव जि. बुलढाणा वय ४३), प्रदीप अनंत रत्नाकर (राहणार बदलापूर वय ५४), मोहम्मद असिफ मोहम्मद युनूस (राहणार खामगाव जि. बुलढाणा वय ३८) अशा एकूण सात आरोपीना बेड्या ठोकल्या आहेत.

या आरोपींच्या गुन्ह्याची पद्धत म्हणजे हे आरोपी महसूल विभागातून अशा जमिनींची माहिती मिळवत होते ज्या जमिनीच्या मालकांचा मृत्यू झाला आहे किंवा त्यांचा कुठलाच तपशील उपलब्ध नाही. गुगल मॅप आणि इतर माहितीच्या आधारे मग ही टोळी या जमीनमालकांची बनवत आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदान कार्ड बनवून बनावट कागदपत्रे बनवत होती. या बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेत एक खाते उघडून त्या नावाने दुसराच माणूस बँकेत उभा करून याच कागदपत्रांच्या आधारे खरेदीदारास जमिनीची विक्री होत होते. याच पद्धतीचा वापर करून या टोळीने सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालय मुळशी येथील कार्यलयात एक खरेदीदस्त नोंदविला आहे.

या टोळीला अटक केल्यानंतर कहांडणी विरोधी पथकाने यांच्याकडून लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनर, बनावट शिक्के बनविण्याची मशीन, आठ मोबाईल, बनावट नावांनी खरेदी केलेली सिमकार्ड, तयार केलेलं बनावट मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, डेबिट कार्ड, बँक पासबुक आणि इतर बनावट कागदपत्रे जप्त केली आहेत.

या टोळीचा म्होरक्या कल्पेश बोरा आणि त्याचे साथीदार बनावट कागदपत्रे तयार करून जमिनीचे व्यवहार करण्याबरोबरच आपल्या देशात वायुद्ध मार्गाने येणारे घुसखोर, लँड माफिया आणि अनेक समाजविघातक लोकांसाठी हवाला रॅकेट ( Racket) चालवत असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिलिटरी इंटेलिजन्स (Military Intelligence) आणि लायझन युनिट पुणे (Liaison Unit Pune) यांनी पत्राद्वारे माहिती दिलेली होती. याच पत्राच्या आधारे पुणे पोलिसांच्या खंडणी विभागाने हे मोठे रॅकेट उघडे पाडले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com