थर्टी फर्स्टला दारु पिण्यासाठी पुणेकरांना लागणार परवाना; कुठे आणि किती रुपयांत मिळणार?
नव वर्षाच्या स्वागतापूर्वी चालू वर्षाला निरोप देण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. नववर्षाच्या स्वागताचे सर्वांना वेध लागले आहे. कोरोना संकटानंतर तब्बल दोन वर्षानंतर मुंबईकर नववर्षाचे जोरदार आणि जल्लोषात साजरा करणार आहे.
याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील 1 लाख 65 हजार नागरिकांना मद्य प्राशन करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने वन डे परमिट दिलंय. हे परवाने हॉटेल, बार यांच्याकडे देण्यात आलेले आहेत. अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे.
यंदा 31 डिसेंबरला राज्य उत्पादन शुल्काचे 10 विशेष पथकं करडी नजर ठेवणार आहेत.वन डे परमिटची किंमत पाच रुपये आहे. विना परवाना मद्य प्राशन किंवा विक्री केली तर गुन्हा दाखल होऊ शकतो. असे सांगण्यात आले आहे. तसेच यंदा डिसेंबर महिन्यात अनधिकृत मद्य विक्री संदर्भात 240 गुन्हे दाखल झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील 1 लाख 65 हजार मद्य परवाने (देशी-विदेशी दारू) म्हणजेच “वन डे परमिट” देण्यात आले आहे. हे परवाने हॉटेल, बार यांच्याकडे देण्यात आलेले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी याबाबत माहिती दिली आहे की, रात्रीच्या गस्ती, अनधिकृत ढाबे, फार्म हाउस तसेच संशयित गाड्यांची तपासणी होणार आहे.