Pune Car Accident Update : पुणे हिट अँड रन प्रकरणात विशाल अग्रवालला तीन दिवसांची पोलीस कोठडी
Pune Hit And Run Case Vishal Agarwal Update : पुण्यात कल्याणी नगरमध्ये मद्यधुंद अवस्थेत कार चालवून दोन जणांचा बळी घेणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवालला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. अगरवालला पुण्याच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. पुणे हिट अँड रन प्रकरणी न्यायालयाने बिल्डर विशाल अग्रवालला ही कारवाई केली आहे. विशाल अगरवाल याच्यासह बार मालक, व्यवस्थापक नितेश शेवानी आणि जयेश गावकरे यांच्यावरही अटकेची कारवाई करण्यात आलीय. सरकारी वकिलांनी विशाल अग्रवालला पोलीस कोठडी देण्याबाबत न्यायालयात मागणी केली होती.
वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विशाल अग्रवाल केली शाईफेक
पुण्यात सत्र न्यायालयात परिसरात अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवालवर शाईफेक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. वंदे मातरम संघटना विशाल अगरवाल विरोधात आक्रमक झाल्याचं समोर आलं. विशाल अग्रवाल पोलीस व्हॅनमधून न्यायालयात नेत असताना त्यांच्यावर शाईफेक केल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे न्यायलय परिसरात एकच गोंधळ उडाला होता. संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्नही केला होता.